भाजपच्या सी-प्लेनला शिवसेनेचे मराठी रंगभूमीचे उत्तर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या सी-प्लेनसाठी गिरगाव चौपाटीवर जेट्टी उभारण्याचा प्रस्ताव नामंजूर केल्यानंतर आज गिरगाव चौपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्रात मराठी रंगभूमी इतिहास दालन उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव प्रशासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. 

मुंबईला लहान शहरांशी जोडण्यासाठी, तसेच पर्यटनाचा विकास करण्यासाठी सी-प्लेन सुविधा सुरू करण्यात येणार होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काही महिन्यांपूर्वी या सी-प्लेनची चाचणीही झाली होती. त्यासाठी गिरगाव चौपाटीवर जेट्टीही बांधण्यात येणार होती. ही जेट्टी बांधण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने पालिकेने बिर्ला क्रीडा केंद्राचा भूखंड मागितला होता. तसा प्रस्ताव प्रशासनाकडून सुधार समितीत मांडण्यात आला होता; परंतु शिवसेनेने तो बहुमताच्या जोरावर फेटाळला. बंद क्रीडा केंद्राची जागा वाचवून शिवसेना विकासाला अडथळा आणत असल्याचा आरोप तेव्हा भाजपकडून केला जात होता. या आरोपांना आज शिवसेनेने उत्तर दिले आहे. 

पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागेवर मराठी रंगभूमी इतिहास दालन उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेने मंजूर केला. मराठी रंगभूमी भवन उभारण्यासाठी शिवसेना दोन वर्षांपासून पालिका अर्थसंकल्पात तरतूद करत आहे. तसेच वर्षभरापूर्वीच्या महापालिका निवडणुकांच्या वेळी शिवसेनेने असे रंगभूमी भवन उभारण्याचे आश्‍वासन दिले होते; परंतु अनेक वर्षांपासून या भवनाला जागा मिळत नव्हती. भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने बिर्ला क्रीडा केंद्राचा पर्याय पुढे आणला. 

Web Title: marathi news shivsena bjp marathi