शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आक्रमक व्हा -  उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मुंबई - राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्‍नावर शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात आक्रमक व्हावे, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांन सोमवारी दिले. 

राज्य सरकारने जनतेला अनेक आश्‍वासने दिली आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करा आणि अधिवेशनावर आपली छाप उमटवा, अशी सूचनाही ठाकरे यांनी केली. विधान भवनाजवळील 'ट्रायडण्ट' या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत पक्षाचे मंत्रीही उपस्थित होते. 

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, यासाठी शिवसेनेने रान उठवले होते. त्यामुळे सरकारने 89 लाख शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेचे पुढे काय झाले, किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, किती शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाले आदी माहिती अधिवेशनात सविस्तर घ्या, अशी सूचना ठाकरे यांनी आमदारांना केली. 

या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आनंदराव अडसूळ यांनी मार्गदर्शन केले. 

Web Title: marathi news shivsena farmer uddhav thackeray