पंतप्रधानांच्या कार्यक्रमात शिवसेनेला डावलले 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

मुंबई  - राज्यासह केंद्र सरकारमध्ये सामील असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला भाजपने शिवसेनेला डावलल्याने शिवसेना नेते संतापले आहेत. यामुळे उद्यापासून युतीतील दोन्ही पक्षांत कलगीतुरा रंगण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमाच्या जाहीराती तसेच निमंत्रण पत्रिकेत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि अन्य लोकप्रतिनिधींना डावलल्याने कालपासूनच शिवसेनेत नाराजी होती. भाजपच्या या कृतीचा निषेध म्हणून नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजनासाठी दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवले. कार्यक्रमाच्या ठिकाणीदेखील भाजपचेच मंत्री उपस्थित होते, तसेच पंतप्रधानांच्या हस्ते मॅग्नेटिक महाराष्ट्राचे उद्‌घाटन सायंकाळी झाले. मॅग्नेटिक महाराष्ट्र सप्ताह उद्योग गुंतवणुकीशी संबंधित असल्याने उद्योगमंत्री सुभाष देसाई वगळता अन्य कुणीही शिवसेनेचे मंत्री किंवा लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. या कार्यक्रमाचे निमंत्रणही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा "सामना' रंगण्याची चिन्हे आहेत. 

Web Title: marathi news shivsena prime minister Narendra Modi Navi Mumbai Airport