भोईवाड्यात घरावर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

शिवडी - परळ पूर्व येथील भोईवाडा गावात तीन पिढ्या वास्तव असलेल्या पांडुरंग वाळंज यांच्या घरावर पालिकेच्या एफ दक्षिण विभागाने गुरुवारी (ता. ८) कारवाई केली. कारवाईपूर्वी स्थलांतरासंदर्भात कोणताही करार न करता पालिकेने स्थलांतराचे पत्र देऊन घर रिकामे करण्यास भाग पाडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. 

भोईवाडा गाव २७ वर्षांपासून पुनर्विकासाच्या वादात अडकले आहे. अनेकांच्या घरांना पालिकेकडून टाळे लावले. तसेच पालिका नागरिकांसोबत करार न करता केवळ स्थलांतराचे पत्र हातात देऊन घरे रिकामी करत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीय घराला टाळे लावल्यानंतरही तेथेच राहत आहेत. पांडुरंग वाळंज यांच्या घराला चार वर्षांपूर्वी टाळे लावले होते. दुसरे घर घेण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे हे कुटुंबीय येथेच वास्तव्य करीत होते. 

पुनर्विकासाला विरोध नाही. पण पालिका कोणताही करार न करता आम्हाला संक्रमण शिबिरात स्थलांतरित करत आहे. हे आम्हाला मान्य नाही. येत्या आठवड्यात पालिकेविरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला. 

महापालिकेची मालमत्ता असल्याने कारवाई केली. त्यासाठी त्यांना पूर्वकल्पना किंवा नोटीस देण्याची गरज नाही. त्यांचे स्थलांतर यापूर्वीच संक्रमण शिबिरात केले आहे. 
- संजय ठाकूर,  सहायक अभियंता, एफ दक्षिण विभाग

Web Title: marathi news shiwadi home