एक हजार सोसायट्यांनी वाचवले 400 कोटी 

समीर सुर्वे
गुरुवार, 8 मार्च 2018

मुंबई - दररोज 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या किंवा 20 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या गृहसंकुलांना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे मुंबई महापालिकेने बंधनकारक केले आहे. त्यासाठी मुंबईतील तीन हजार 300 गृहसंकुलांना नोटीस पाठविण्यात आली होती. त्यातील एक हजार गृहसंकुलांमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाल्यामुळे डम्पिंगवरील दोन हजार 300 मेट्रिक टन कचरा कमी झाला आहे. 

हा कचरा कमी झाल्याने पालिका आता देवनार डम्पिंगवर तीन हजार टनांऐवजी 650 टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणार आहे. त्यामुळे पालिकेच्या 400 ते 450 कोटींची बचत होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. या 400 कोटींमध्ये 150 ते 200 उद्याने उभारली जाऊ शकतात. एवढेच काय कफ परेड येथील समुद्रात उभारण्यात येणाऱ्या समुद्रातील थीम पार्क कचऱ्याच्या बचतीतून उभारले जाऊ शकते. कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याने देवनार येथे कमी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत, असे उपायुक्त विजय बालमवार यांनी सांगितले.     
 
Web Title: marathi news society garbage mumbai