esakal | अभ्यासक्रम अपूर्ण असल्याने विद्यार्थी शिक्षकांनी घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट, केली महत्त्वपूर्ण मागणी

बोलून बातमी शोधा

अभ्यासक्रम अपूर्ण असल्याने विद्यार्थी शिक्षकांनी घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट, केली महत्त्वपूर्ण मागणी}

राज्यभरातून आलेल्या शिक्षकांनी गायकवाड यांची भेट घेऊन अभ्यासक्रम अर्धवट राहीला असल्याने त्या संदर्भातील वस्तुस्थिती आणि संपूर्ण माहिती दिली.

अभ्यासक्रम अपूर्ण असल्याने विद्यार्थी शिक्षकांनी घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट, केली महत्त्वपूर्ण मागणी
sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : कोरोनामुळे मुंबईसह राज्यातील असंख्य शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम अजूनही अपूर्ण आहे यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनातील भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने सरकारने या दोन्ही परीक्षांचा 50 टक्के अभ्यासक्रम कमी करून त्या आधारित 50 मूल्यमापन पद्धतीने परीक्षा घ्याव्यात  अशी मागणी आज विद्यार्थी आणि शिक्षकांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे  केली.

या मागणीसाठी राज्यभरातून आलेल्या शिक्षकांनी गायकवाड यांची भेट घेऊन अभ्यासक्रम अर्धवट राहीला असल्याने त्या संदर्भातील वस्तुस्थिती आणि संपूर्ण माहिती दिली. तसेच जे अंतर्गत आणि प्रात्यक्षिक आदींसाठी गुण दिले जातात, त्यासाठीही वेगळा विचार करून त्यात बदल करावा अशी मागणीही करण्यात आली.

महत्त्वाची बातमी : "गर्दी झाली तर सुनावणी घेणार नाही", सुनावणीदरम्यानच्या गर्दीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची नाराजी

राज्यात 2020-21 या शैक्षणिक वर्षात कोरोना या महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर अभ्यासक्रम अर्धवट राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना अंतर्गत गुण सरसकट द्यावेत आणि प्रात्यक्षिक परीक्षा न घेता त्यासाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने काही लिखित परीक्षा घ्याव्यात अथवा ते रद्द करावेत, असा पर्यायही शिक्षकांनी सुचवला असल्याची माहिती देण्यात आली.

दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा या ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने घेतल्या जाव्यात,  तसे पर्याय सर्व ठिकाणी उपलब्ध केले जावेत. ज्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण घेत आहेत, त्याच शाळांमध्ये त्यांची परीक्षा केंद्र दिली जावी, तसेच दहावी आणि बारावीच्या  परीक्षांचे 50 टक्के मूल्यमापन करण्याचे अधिकार शाळांना दिले जावेत आणि अभ्यासक्रम कमी केल्यानंतर त्यासाठीच्या प्रश्नपत्रिका आणि त्यासाठी सर्व स्वतंत्र पॅटर्न विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी शिक्षण मंडळाने तातडीने शाळा आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

महत्त्वाची बातमी : संशय आल्याने मुलगा खाली आला, आईचे हातपाय बांधून ठेवलेले पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली

देशात आणि राज्यातील  सैनिकी शाळा 50 टक्के अभ्यासक्रमावर आधारित सामान्य ज्ञान  हा अनिवार्य  विषय करून त्याप्रमाणे परीक्षा घेतात, त्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने काही वेगळा पर्याय देऊन विद्यार्थ्यांना 50 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घ्यावी अशी मागणीही आज शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केली असल्याची माहिती शिक्षकांकडून देण्यात आली.

mumbai news students and teachers group met school education minister varsha gaikwad