पर्जन्य जलवाहिन्यांसाठी मुंबईवर कराचे संकट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

मुंबई - वाढता खर्च भागविण्यासाठी महापालिका नव्या कराचा शोध घेत असताना लेखापरीक्षकांनी पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामांकरिता स्वतंत्र करआकारण्याची शिफारस केली आहे. पाणी आणि मलनिस्सारण खात्याप्रमाणे पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामासाठीही कर आकारावे, असे अहवालात नमूद केले आहे. 

पालिकेच्या लेखापरीक्षकांनी 2012-13 या आर्थिक वर्षाचा अहवाल स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे. त्यामध्ये पर्जन्य जलवाहिन्यांसाठी निधी देण्यासाठी वेगळा करआकारण्याची शिफारस करण्यात आली आहे. पाणी आणि मलनिस्सारण सेवेप्रमाणे पालिकेस पर्जन्य जलवाहिन्यांची कामे, प्रकल्प आणि प्रवर्तनाचा खर्च पालिकेच्या अंतर्गत निधीतून खर्च केला जातो. त्यामुळे पर्जन्य जलवाहिन्या विभागाचा खर्च भागविण्यासाठी वेगळा कर लावावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. पर्जन्य जलवाहिन्यांचा विविध कामांसाठी पालिकेने 2010 पासून आतापर्यंत पाच हजार 561 कोटी 71 लाख खर्च केला आहे. 2018-19 या वर्षात 565 कोटींची तरतूद केली आहे, तर पर्जन्य जलवाहिन्या विभागाला फक्त कंत्राटदारांकडून उत्पन्न मिळते. प्रकल्पाच्या निविदांची अर्ज विक्री, कंत्राटदारांकडून वसूल केलेला दंड या मार्गातून पालिकेला उत्पन्न मिळते. हे खर्चाच्या सुमारे सात टक्के एवढेच असते. त्यामुळे कर लावण्याची गरज असल्याचे मत अहवालात नमूद केले आहे.

Web Title: marathi news tax water municipal corporation