पारा चढलेलाच! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई - काही दिवसांपासून काहिलीचा सामना करणाऱ्या राज्यातील नागरिकांना बुधवारीही उन्हाच्या तप्त झळांना सामोरे जावे लागले. राज्यातील बहुतांश भागांत बुधवारी 37 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईत गुरुवारी 38 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद होऊ शकेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

मुंबईत 37.4 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. मुंबई, रायगड आणि रत्नागिरीसह कोकणातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचा प्रभाव दिसत आहे. गुरुवारीही नागरिकांची उकाड्यापासून सुटका होणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

केंद्रीय वेधशाळेच्या माहितीनुसार, पंजाब, जम्मू आणि काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थानचा पश्‍चिमेकडील भाग, सौराष्ट्र, कच्छमधील बहुतांश भागांत कमाल तापमानात पाच अंश सेल्सिअसची वाढ नोंदवली जात आहे. गुजरात आणि उत्तर कोकणातील काही भागांत तसेच पूर्व राजस्थानच्या काही भागांतही हीच परिस्थिती आहे. 

राज्यात विदर्भातील जवळपास सर्वच भागांत 37 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद होत आहे. 

रायगड जिल्ह्यातील भिरा येथे बुधवारीही राज्यातील कमान तापमानाची नोंद झाली. तेथे 41 अंश सेल्सिअसवर कमाल तापमान नोंदवले गेले. त्याखालोखाल अकोला 38.2 तर नांदेडमध्ये 38 अंश सेल्सिअस कमाल तापमान होते.

Web Title: marathi news temperature mumbai