आगीत नुकसान झालेल्या कुटुंबीयांना मदतीचा हात

नंदकिशोर मलबारी
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

सरळगाव (ठाणे) : 5 फेब्रुवारीला मुरबाड शहरात लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या कुटुंबीयांना मदतीचा हात म्हणून शासनाच्या वतीने स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते 5 लाख रूपयांचे धनादेशाचे चेक वाटप करण्यात आले.

सरळगाव (ठाणे) : 5 फेब्रुवारीला मुरबाड शहरात लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या कुटुंबीयांना मदतीचा हात म्हणून शासनाच्या वतीने स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते 5 लाख रूपयांचे धनादेशाचे चेक वाटप करण्यात आले.

मुरबाड शहरात लाखो रूपये किमतीच्या सागवान लाकडाने बांधलेली 125 वर्ष डौलाने उभी असलेली इमारत 5 फेब्रुवारीला रात्री 10.30 वाजता लागलेल्या आगीत पत्याच्या बंगल्या प्रमाणे जळून खाक झाली. यात सहा कुटुंबीय बेघर झाली होती. अचानक लागलेल्या आगीत जिव वाजवण्याच्या प्रयत्नात कोणतीही वस्तू घरातून काढता न आल्याने जीव वाचला पण आयुष्य भराची कमाई या आगीत जळून खाक झाली. आग लागल्याची घटना समजतात स्थानिक आमदार बदलापूर वरून अवघ्या 15 मिनिटात मुरबाड शहरात हजर तर झालेच पण कल्याण, भिंवडी, अंबरनाथ व मुरबाड येथील अग्निशामक पथकांना तातडीने फोन करून मुरबाड येथे त्यांना बोलावून घेतले. 

आगनिशामकच्या गाड्या हजर झाल्या मात्र तो पर्यंत आग चांगलीच भडकली होती. आगीच्या बंबातील पाणी कमी पडू लागल्याने स्थानिक पाणी टँकरचे मालक दिनेश तोंडलिकर, किशोर सासे, जितेंद्र सोनटक्के, व अर्जून शेळके यांनी तातडीने पाण्याचे टॅक्करने पाणी पुरवठा केल्याने आग आटोक्यात आणण्यास आगनिशामग दलाचे जवान यशस्वी झाले. त्यांचेही कौतुक चेक वाटप कार्यक्रमात करण्यात आले.                               

आग लागल्याचे समजताच कल्याण येथून प्रांत अधिकारी प्रशांत उकिरडे, मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर व नायब तहसीलदार हनुमंत जगताप स्वतः तातडीने घटनास्थळी हजर होऊन या गर्दीत सामिल होऊन सहकार्य करीत होते. राजकारण बाजूला सारून अनेक राजकीय पक्षातील कार्यकर्ते आगीच्या घटनास्थळी  उपस्थित होते. आग लागल्याने आगीच्या ठिकाणी हजारो नागरीक उपस्थित असल्याने मोठा अडथळा निर्माण झाला होता. शेवटी लोकांना हटविण्यासाठी अखेर मशिदेवरील भोंग्याचा उपयोग केला. त्यांचेही कौतूक करण्यात आले.

आगीमुळे झालेली नुकसान आमदार म्हणून कथोरे व प्रशासन म्हणून तहसीलदार चौधर यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहील्याने आपुलकीच्या नात्याने तातडीने पंचनामे करून 5लाखाची मदत तातडीने शासन दरबारी मंजूर करून त्याचे वाटपही आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते जळत कूटूबींय मंगला गोपिनाथ तेलवणे, सुमती विनायक तेलवणे, गणेश एकनाथ तेलवणे, वसंत तेलवणे यांना प्रत्येकी 80 हजार 730 धनादेश  देण्यात आले.तर दिलीप रघुनाथ तेलवणे , अशोक यशवंत राखाडे व संजय नथूराम तेलवणे यांना प्रत्येकी 5 हजार 200 रूपयांचे धनादेश देण्यात    आले. मुरबाड एम आय डी सी च्या वतीने 5 लाखाची मदत करण्यात आली. या वेळी नायब तहसीलदार हनुमंता जगताप, मुरबाड वैश्य युवक मंडळाचे अध्यक्ष सुधिर तेलवणे,  मुरबाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मोहन सासे, अंनंत कथोरे, भाजपाच्या महिला मोर्चाच्या महिला अध्यक्ष शीतल तोंडलिकर, राजाभाऊ म्हात्रे, अग्निशामक दलाचे अधिकारी सोनावणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

मुरबाड वैश्य समाज संघटनेने व जिल्हा वैश्यसमाज संघटनेने  वैश्य समाजातील वैश्य बांधवांना मदतीचे आवाहन केले आणि जिल्ह्यातील प्रत्येक कटातून तसेच रायगड जिल्ह्यातूनही भरभरून मदत आली या सर्वांचे आभार या कार्यक्रमात मानण्यात  आले. तोंडलिकर कूटूबींयीयांच्या वतिने मानवतेच्या दृष्टी कोनातून  जळित तीन कडूबीयांना सहा महिन्यासाठी मोफत राहाण्याची व्यवस्था करण्यात आली. तर मुरबाड शहरातील वैश्य बांधवानी एकत्र येऊन आर्थिक मदतीचा हात दिला. तर मुरबाड शहरातील अंजली गॅसच्या वतीने सहा कूटूबांला गॅस शेगडी व सिलिंडर देण्यात आले या सर्वांचे कौतूक आमदार किसन कथोरे यांनी करून त्यांना धन्यवाद दिले. 
 

Web Title: Marathi news thane news fire help to victims