वाडा-तिळसे येथे हजारो शिवभक्तांनी घेतले तिळसेश्वराचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

वाडा : महाशिवरात्रीनिमित्त आज तालुक्यातील तिळसे येथे भक्तांचा मळा फुलला होता. हजारो शिवभक्तांनी तिळसेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. तिळसा परिसर भक्तांनी फुलून गेला होता. त्याचप्रमाणे तालुक्यातील नारे, कोंढले, घोडमाळ, गातेस व सापने येथील महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. 

वाडा : महाशिवरात्रीनिमित्त आज तालुक्यातील तिळसे येथे भक्तांचा मळा फुलला होता. हजारो शिवभक्तांनी तिळसेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. तिळसा परिसर भक्तांनी फुलून गेला होता. त्याचप्रमाणे तालुक्यातील नारे, कोंढले, घोडमाळ, गातेस व सापने येथील महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. 

वाड्याच्या नगराध्यक्ष गितांजली कोळेकर यांच्या हस्ते पहाटे पुजा करण्यात आली. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, आमदार पांडुरंग बरोरा यांनीही  तिळसेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. तिळसेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या वैतरणा नदीच्या डोहात देवमासे आहेत. हे देवमासे बघण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. यात्रेत भाविकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाणी व सरबत, शिवसेनेच्या वतीने पाणी व फराळाची मोफत सोय केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या 14 वर्षापासून ही सुविधा उपलब्ध करून देत असल्याची माहिती माजी तालुका अध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी दिली. 

गुडलक यंग स्टार क्लबच्या वतीने ही पाणी व सरबताची सोय केली होती. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. वाडा आगारातून पाच दहा मिनिटांनी बसची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामस्थांकडून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. अध्यात्म विचार प्रबोधिनी यांच्यामार्फत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. तिळसा येथे वाडा पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे अनुचित प्रकार न घडल्याची माहिती वाड्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी दिली. तिळसा देवस्थानच्या वतीने भक्तांसाठी चांगले नियोजन करण्यात आले होते. भक्तांना वेळोवेळी स्पिकर वरून मार्गदर्शन करण्यात येत होते. स्वच्छ व सुंदर तिळसे ठेवण्यासाठी वेळोवेळी माहिती दिली जात होती. कचरा इतरत्र न टाकता कचऱ्याच्या पेटीत टाकण्यासाठी वेळोवेळी सुचना दिल्या जात होत्या. 

Web Title: Marathi news thane news lord shiva mahashivratri