ग्रामविकास मंत्री पंकज मुंडे यांच्या निर्णयाला हायकोर्टाचा दणका

नंदकिशोर मलबारी
सोमवार, 15 जानेवारी 2018

सरळगांव : मुरबाड तालुक्यातील नढई ग्रामपंचायतीचे वादग्रस्त सरपंच पद हायकोर्टाच्या आदेशाने रद्द करण्यात आल्याने दोन वेळा सरपंच पदावरुन पायऊतार होण्याची नामुष्की ओढवल्याने  मुरबाड मधील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र हायकोर्टाचा हा निकाल राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या निकालाविरोधात असल्याने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दणका मिळाल्याची चर्चा मुरबाडमध्ये सुरु आहे.

सरळगांव : मुरबाड तालुक्यातील नढई ग्रामपंचायतीचे वादग्रस्त सरपंच पद हायकोर्टाच्या आदेशाने रद्द करण्यात आल्याने दोन वेळा सरपंच पदावरुन पायऊतार होण्याची नामुष्की ओढवल्याने  मुरबाड मधील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र हायकोर्टाचा हा निकाल राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या निकालाविरोधात असल्याने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दणका मिळाल्याची चर्चा मुरबाडमध्ये सुरु आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नढई ग्रामपंचायतीच्या सरपंच पद्मा रमेश टोहोके यांनी टेंभरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मयत असलेल्या गौरूबाई शंकर केंबारी नढई येथील रहिवासी असल्याचा व मी त्यांना ओळखते असा दाखला दिला होता. हा दाखला देताना आपला दीर शिवाजी गोविंद टोहोके यांच्या सासूबाई भागीरथी पदू दिनकर यांचा फोटो लावून खोट्या सहीने दाखला दिला होता. या दाखल्याचा उपयोग 7 ऑक्टोबर 2013 ला दुय्यम निबंधक मुरबाड यांच्याकडे हक्कसोड नोंदणीसाठी वापरण्यात आला होता. मात्र हक्कसोड नोंदणीसाठी वापरलेला दाखला खोटा असल्याची तक्रार भाऊ बूधाजी टोहोके व संतोष नामदेव टोहोके यांनी विभागीय आयुक्त कोकण यांच्याकडे 24 जून 2016 ला लेखी तक्रार करुन केली होती. या तक्रारीत ग्रामपंचायत सरपंच पद्मा रमेश टोहोके यांनी टेंबरे ग्रामपंचायत हद्दीतील सासूरवाशीण व नढई या गावातील माहेरवाशीन व सरपंच यांनीच नात्याने पतीची आत्या असलेल्या मयत व्यक्ती गौरूबाई शंकर केंबारी यांना रहिवासी असल्याचा संगमताने दाखला दिला होता. अशी तक्रार केली. या तक्रारीची दखल कोकण आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून सरपंच यांनी दिलेला दाखला खोटा असल्याचे निष्पन्न केल्याने या कामी दोषी असलेल्या संरपंच टोहोके यांना सरपंच पदावरून निलंबित केल्याचा निर्णय दिला. या निर्णया वरून सरपंच टोहोके यांना सरपंच पद सोडावे लागले. 

मात्र आयुक्तांनी दिलेला निर्णय सरपंच टोहोके यांना मान्य नसल्याने सरपंच टोहोके यांनी ग्रामविकास महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई याच्या न्यायालयात आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी अपील केले. या अपीलावर या ग्रामविकास विभागाने चौकशी करून आयुक्तांनी सरपंच पद रद्द केलेला निकाल रद्दबादल करून सरपंच टोहोके यांना सरपंच पदी राहण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे टोहोके हे पुन्हा एकदा सरपंच पदी विराजमान झाले. मात्र प्रतिवादी भाऊ बूधाजी टोहोके व संतोष नामदेव टोहोके यांना हा निर्णय मान्य नसल्याने टोहोके यांनी ग्रामविकास मंत्रालयाने दिलेला निर्णया विरोधात हायकोर्टात अपील केले. या अपीलावर सुनावणी होऊन ग्रामविकास मंत्रालयाने दिलेला निर्णय रद्द करून सरपंच टोहोके यांना सरपंच पदावरून हटविण्यात आल्याचा निर्णय दिला या निर्णयामुळे एकाच पदासाठी दोन वेळा पायउतार व्हावे लागल्याने दोन वेळा पद सोडण्याची नामुष्की ओढवली तर ग्रामविकास मंत्रालयाने दिलेल्या निकालाविरोधात निकाल दिल्याने या मंत्रालयाला चांगलाच झटका मिळाला तर तालुक्यात अशी घटना पहिल्यांदाच घडल्याने या घटनेची  चर्चा जोरदार सुरु आहे.         

 

Web Title: Marathi news thane news rural development minister pankaja munde