ठाण्यातील वाड्यात कडकडीत बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

वाडा : कोरेगाव भिमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज वाडा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी कुडूस नाका येथे भिमसैनिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करून जोरदारपणे घटनेचा निषेध नोंदविला. वाडा तालुक्यातील वाडा शहर, कुडूस, खानिवली, कंचाड, शिरीषपाडा व आबिटघर या महत्वाच्या बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे येथे शुकशुकाट होता. कूडूस नाका येथे सुमारे अर्धा तास भिमसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन करून घटनेचा निषेध केला. यावेळी भिमसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

वाडा : कोरेगाव भिमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज वाडा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी कुडूस नाका येथे भिमसैनिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करून जोरदारपणे घटनेचा निषेध नोंदविला. वाडा तालुक्यातील वाडा शहर, कुडूस, खानिवली, कंचाड, शिरीषपाडा व आबिटघर या महत्वाच्या बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे येथे शुकशुकाट होता. कूडूस नाका येथे सुमारे अर्धा तास भिमसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन करून घटनेचा निषेध केला. यावेळी भिमसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात रिपब्लिकन नेते डी.जी.भोईर, रमेश भोईर, रामदास जाधव, नितीन जाधव, स्वप्नील जाधव, आनंद भोईर, हेमंत भोईर, रमण जाधव, सदानंद अडकमोळ, अशोक जाधव, काँग्रेसचे मुस्तफा मेमन, भाजपचे भगवान चौधरी, श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव, रवींद्र चौधरी, कल्पेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश पवार आदींसह मोठय़ा संख्येने भिमसैनिक सहभागी झाले होते. भिमा कोरेगांव घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा नेते स्वप्निल जाधव यांनी यावेळी बोलताना दिला.

वाडा शहरात भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर तिचे तहसील कार्यालयासमोल सभेत रूपांतर झाले. सभेत मार्गदर्शन करताना नेत्यांनी घटनेचा निषेध केला. भिमसैनिकांनी निषेधाच्या घोषणा जोरदारपणे दिल्या. यावेळी नगरसेवक रामचंद्र जाधव, मंदाताई कांबळे, वैभव पालवे, भरत थोरात, सचिन मुकणे, नंदा बोरकर, जयेश थोरात, शुभम जाधव आदींसह भिमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तालुक्यात ग्रामीण भागात बससेवा सुरळीत सुरू  होती. तालुक्यात ग्रामीण भागात बससेवा सुरळीत सुरू होती. मात्र लांबपल्याच्या गाड्या बंद असल्याने प्रवासी व विद्यार्थी यांचे हाल झाले. अत्यावश्यक सेवा वगळता बंद कडकडीत पाळण्यात आला. पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दंगल पथकांच्या जवानांनाही तैनात करण्यात आले होते. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती नाईक यांनी दिली. 

Web Title: Marathi news thane news strike in wada