ठाणे : मुरबाडमधील शिक्षकांना लोकप्रतिनीधींमुळे दिलासा

Murbaad
Murbaad

मुरबाड (ठाणे) : गेली तीन वर्षे ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका न झाल्याने शिक्षकांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी उपलब्ध नव्हते आता जिल्हापरिषदे मध्ये लोकप्रतिनिधी आल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती सुभाष पवार यांनी शिक्षकांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी बैठक घेऊन ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना दिलासा दिला.

मुरबाड (ठाणे) वर्षानुवर्षे प्रलंबित चट्टोपाध्याय समितीच्या महत्वाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या सुचना ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती सुभाष गोटीराम पवार यांनी दिल्याने जिल्ह्यातील शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

ठाणे जिल्ह्यात पालघर जिल्ह्या प्रमाणेच मोठा आदिवासी भाग आहे तसेच शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत पालघरमधून ठाण्यात येण्यासाठी इच्छूक शिक्षकांना सामावून घेण्याबरोबरच ठाण्याहून पालघरमध्ये बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठाणे जिल्ह्यातच सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आदेश पवार यांनी दिल्याने ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यात बदलीची टांगती तलवार असलेल्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.   

शिक्षकांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित समस्यांचा आढावा घेण्यासाठी सुभाष गोटीराम पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना यादव, सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकाऱ्यांबरोबरच शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शिक्षकांच्या समस्यांबरोबरच प्रशासनाच्या अडचणीही उपाध्यक्षांनी समजून घेतल्या. 

बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. शाळेचे वीज बील ग्रामपंचायतीने भरणे शिक्षकांची निवडश्रेणी, वेतन समानीकरण, विकल्प आदी मुद्यांची 15 मार्चपर्यंत अंमलबजावणी करणे शिक्षकांचे पगार दरमहा 5 तारखेपर्यंत, पोषण आहार बिले लवकर मंजूर होणार, वैद्यकीय खर्च फाईल व प्री-ऑडीट बिले लवकर निकाली, केंद्रस्तरीय स्पर्धांबरोबरच क्रीडा स्पर्धांच्या अनुदानात वाढ, क्रीडा स्पर्धेत जखमी विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी अनुदान, पदवीधर शिक्षकांना सहशिक्षक म्हणून घेण्याबाबत स्वतंत्र बैठक, पालघरमधून नियुक्तीवर आलेल्या शिक्षकांच्या जून-जुलैतील पगारासाठी तरतूद. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com