कब्रस्तानच्या मागणीचे पडसाद विधानसभेच्या पायऱ्यांवर

दिनेश गोगी
गुरुवार, 15 मार्च 2018

उल्हासनगर : गेल्या 40 वर्षांपासूनच्या लढ्यानंतरही मुस्लिमांना कब्रस्तान मिळत नसल्याने पालिकेच्या आवारात दोनदा जनाजे आंदोलने झाली आहेत. कब्रस्तानच्या अभावी एका मुस्लिम महिलेचा मृतदेह तब्बल 18 तास घरात ठेवण्याची वेळ महिलेच्या नातलगांवर आली होती. या भावनिक मुद्यांना हात घालणारे शिवसेनेचे आमदार डॉ.बालाजी किणीकर आज उल्हासनगरातील कब्रस्तानच्या मागणीचे पडसाद आज विधासभेच्या पायऱ्यांवर निदर्शने करून उमटवले.

सध्या सुरू असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. डॉ. बालाजी किणीकर यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह तमाम मंत्री अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी आमदार सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, उल्हासदादा पाटील,अमित घोडा, शांताराम मोरे, तृप्ती सावंत, अशोक पाटिल, प्रकाश वाजे,योगेश घोलप, भाई जगताप हे उपस्थित होते.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्यानुसार कब्रस्तानाकरिता आरक्षित असलेल्या भूखंडावर सार्वजनिक उपयोगाकरिता असे नव्याने आरक्षण टाकण्यात आलेले आहे.त्यामुळे  मुस्लीम समाजाकरिता पुन्हा कब्रस्थानाकरिता गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दोन जनाजे पालिकेच्या प्रवेशद्वारावर आणून मुस्लिमांनी आंदोलन केले होते. तसेच 8 मार्चला उल्हासनगर शहरात कब्रस्थान नसल्याने तेथील एका मुस्लिम महिलेच्या शवाला अंबरनाथ येथील दफन भूमीत दफन करण्याकरिता तब्बल 18 तास प्रतिक्षेत ठेवण्यात आले होते. यामुळे तेथील मुस्लिम समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भावनिक बाब आ. डॉ. किणीकर यांनी यावेळी मांडली.

म्हारळ, सर्वे नं. 58 मधील 8 हजार चौ.मी. येथे मुस्लिम समाजाकरीता कब्रस्थान उभारण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने दि.2 जुलै 2015 रोजीच्या महासभेचा ठराव क्र.14 कब्रस्तानसाठी आरक्षित केलेला होता. या भूखंडावर कब्रस्थान विकसित करण्यासाठी  रिजन्सी निर्माण लिमिटेड चे संचालक महेश अग्रवाल यांनी हा भूखंड पालिकेकडे हस्तांतरित केलेला आहे.मात्र या भूखंडाचे भिजत घोंगडे अद्यापही कायम असून पालिकेने राज्यशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे आ.डॉ.बालाजी किणीकर यांनी सांगितले.
 
Web Title: Marathi news ulhasnagar news demand of graveyard for muslims