उल्हासनगर पालिकेची परिवहन सेवा तीन महिन्यांत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

वाढीव भाडे आकारले जाते .याशिवाय विद्यार्थ्यांना परिवहन सेवेचा मोठा आधार होता.त्यांनाही रिक्षाच पर्याय ठरत आहे. त्यासाठी खिशाला महिन्यापोटी हजारो रुपयांचा फटका बसत असल्याने गोरगरीब हवालदिल झालेले आहेत. अशा तक्रारींचा पाढा अनेक सामाजिक संघटनांनी वाचला होता.

उल्हासनगर : शिवसेनेच्या कालावधीत सुरू झालेल्या मात्र भाड्याची दरवाढ होत नसल्याने आणि त्यामुळे पालिका परिवहन सेवेचे खाजगी कंत्राटदार केस्ट्रल कंपनीचे राजा गेमनानी यांनी परिवहनचा गाशा गुंडाळल्याने गेल्या चार वर्षांपासून ठप्प पडलेली उल्हासनगरातील परिवहन सेवा येत्या तीन महिन्यांत धावणार आहे, असे स्थायी समिती सभापती कंचन अमर लुंड आणि नगरसेवक शेरी लुंड यांनी केलेल्या या मागणीला आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सकारात्मक घेताना तीन महिन्यात पालिकेची परिवहन सेवा धावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे गोरगरिबांची रिक्षांच्या भुर्दंडातून सुटका होणार आहे.

महापौरपदी शिवसेनेच्या राजश्री चौधरी असताना 2010 मध्ये पालिकेची परिवहन सेवा सुरू झाली.ही सेवा केस्ट्रल कंपनीचे राजा गेमनानी यांनी तीन वर्षे हाताळली.मात्र, इतर शहराप्रमाणे भाडेवाढ होत नसल्याने व खड्यांमूळे बसेसच्या दुरुस्तीत बिघाड होत असल्याने कंपणी तोट्यात असल्याची ओरड करून गेमनानी यांनी परिवहन सेवेचा गाशा 2013 मध्ये गुंडाळला. तेव्हापासून परिवहन सेवा असल्याने शहरातील नागरिकांना ये- जा करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत असून, याचा फायदा रिक्षाचालक घेत आहेत.

वाढीव भाडे आकारले जाते .याशिवाय विद्यार्थ्यांना परिवहन सेवेचा मोठा आधार होता.त्यांनाही रिक्षाच पर्याय ठरत आहे. त्यासाठी खिशाला महिन्यापोटी हजारो रुपयांचा फटका बसत असल्याने गोरगरीब हवालदिल झालेले आहेत. अशा तक्रारींचा पाढा अनेक सामाजिक संघटनांनी वाचला होता. त्यात तथ्य असल्याने आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधल्याचे शेरी लुंड, कंचन लुंड यांनी सांगितले.

याबाबत आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याशी विचारणा केली असता, ''येत्या तीन महिन्यांत पालिकेची परिवहन सेवा सुरू करून गोरगरीब नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबवली जाणार आहे. त्यासाठी 20 बसेस खरेदी करण्यात येणार असून, पुढील आठवड्यापर्यंत निविदा प्रक्रिया हाताळली जाणार आहे, अशी माहिती निंबाळकर यांनी दिली.

Web Title: Marathi news Ulhasnagar news transport services