esakal | लग्नकार्य करा जपून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BMC ची धडक कारवाई

बोलून बातमी शोधा

लग्नकार्य करा जपून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BMC ची धडक कारवाई}

लग्नामध्ये होणाऱ्या गर्दीवर वचक ठेवण्यासाठी महानगर पालिकेच्या पथकाने आता पोलिसांच्या सोबतच धाडी टाकण्यास सुरवात केली आहे.

mumbai
लग्नकार्य करा जपून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BMC ची धडक कारवाई
sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई - लग्नामध्ये होणाऱ्या गर्दीवर वचक ठेवण्यासाठी महानगर पालिकेच्या पथकाने आता पोलिसांच्या सोबतच धाडी टाकण्यास सुरवात केली आहे. शुक्रवारी कलिन येथील तीन हॉलमध्ये धाडी टाकून नियमाच्या चौपट गर्दी जमल्या बद्दल महानगर पालिकेने गुन्हे दाखल केले आहेत.
लग्नकार्य, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना 50 माणसांपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहाण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा लग्नकार्यावर यापुर्वीही महानगर पालिकेने धाडी टाकून गुन्हे दाखल केले आहेत.मात्र,आजही मुंबईत धुमधडाक्‍यात लग्नकार्य सुरु आहे.अशा लग्नांसह इतर कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने प्रत्येक प्रभागात चार पथके तयार केली आहे.आता तर पोलिसां सोबतच पालिकेचे पथक गस्त घालू लागले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

पालिकेच्या एच पुर्व प्रभागाचे पथक अशाच गस्तीवर असताना कलिना परीसरातील ग्रॅन्ड हॉल,गुरुनानक हॉल,नुर मॅरेज हॉल या ठिकाणी पालिकेच्या पथकाने पाहाणी असते तेथे 200 ते 300 वऱ्हाडी जमलेले आढळले.तसेच,मास्कही वापरले नव्हते.त्याच बरोबर सामाजिक अंतरही राखण्यात आले नव्हते.महानगर पालिकेने या प्रकरणी तत्काळ वकोला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
महानगर पालिकेच्या पथकाने तीन्ही हॉल मधील गर्दी कमी करण्याच्या सुचना सभागृहाच्या प्रमुखांना दिल्या.मात्र,त्यानंतरही ते गर्दी कमी करत नव्हते.अखेरीस महानगर पालिकेने कारवाईचा निर्णय घेतला.
----
हॉल बुक करणाऱ्यावर गुन्हा
नियमबाह्या पध्दतीने होत असलेल्या सोहळ्यांमध्ये हॉल ज्याच्या नावाने बुक करण्यात आला आहे.त्याच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे.तसेच,हॉलचे व्यवस्थापक,तसेच पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला जात आहे.कलिना येथील तीन्ही हॉलचे प्रमुख रफिक हसन शेख,शाम खान,समित अब्दुल पारुख यांच्यावर साथ नियंत्रण कायदा 1898,आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंड सहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

marathi news updates BMCs action on marriage ceremony in mumbai live