पारा आज 38 अंशांवर? 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मुंबई - मुंबईचे कमाल तापमान सोमवारी 36.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सलग तिसऱ्या दिवशी काहिली सोसावी लागली. दरम्यान, मंगळवारी 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होऊ शकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

राज्यातील बहुतांश भागांतील तापमान 35 अंश सेल्सिअसपुढे आहे. काही भागांतील कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) - भिरा - 40.8, ठाणे - 34.8, अलिबाग - 33.5, रत्नागिरी - 36.8, उस्मानाबाद - 35.8, जालना - 35.2, उदगीर - 35.2, नांदेड - 37, परभणी - 37.2, औरंगाबाद - 35.2, महाबळेश्‍वर - 30.4, सोलापूर - 37.6, सांगली - 36.8, सातारा - 35.1 कोल्हापूर - 34.8, जळगाव - 37.4, मालेगाव - 36.2, नाशिक - 34.8, नाशिक - 34.8, हरणे - 33.5 

Web Title: marathi news weather mumbai temperature maharashtra