कल्याण आरटीओमार्फत विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

रविंद्र खरात 
बुधवार, 13 डिसेंबर 2017

कल्याण : रस्त्यावर वाहन चालवताना नियमांचे पालन केल्यास स्वतःची सुरक्षा होतेच, त्यासोबत अपघातही कमी होतील त्यासाठी शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत कार्यशाळा, जनजागृती, प्रशिक्षण दिले जात असून हा उपक्रम राबविण्यासाठी अनेक शाळा, कॉलेज पुढाकार घेत असल्याची माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली. 

कल्याण : रस्त्यावर वाहन चालवताना नियमांचे पालन केल्यास स्वतःची सुरक्षा होतेच, त्यासोबत अपघातही कमी होतील त्यासाठी शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत कार्यशाळा, जनजागृती, प्रशिक्षण दिले जात असून हा उपक्रम राबविण्यासाठी अनेक शाळा, कॉलेज पुढाकार घेत असल्याची माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली. 

दुचाकी आणि चारचाकी कारचे आकर्षण सर्वांनाच लहानपणापासून असते, बाईक आणि कार चालवण्यात युवक युवतींची संख्या सर्वात जास्त आहे. मात्र त्यांना परवाना मिळवण्यापूर्वी वाहनांची माहिती असते, त्यामुळे युवक युवतींकडून चुका होऊन अपघात आणि रस्त्यावर नियम मोडले जातात. हे प्रमाण कमी करण्यासाठी कल्याण आरटीओने यावर्षी वाहन ट्रेनिंग स्कूलमार्फत शाळा आणि कॉलेज मधील विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. 

बांडे मोटर ट्रेनिंग स्कूलच्या पुढाकाराने कल्याण मधील माजी नगरसेवक आणि चेअरमन सचिन पोटे आणि कार्यकारी संचालक बिपीन पोटे यांच्या प्रसिद्ध केंम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बांडे मोटर ट्रेंनिग स्कूलचे संचालक देवराम बांडे,  केंम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका रोमा माळी, आरटीओ सहायक मोटार वाहन निरीक्षक जयेश देवरे, सामाजिक कार्यकर्ते रवी गायकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत केंम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलच्या सिनियर केजीच्या 56 विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचे धडे घेतले. यावेळी वाहन चालविताना रस्त्यात अनेक ठिकाणी सिग्नल येतात तेव्हा काय करावे, सिग्नल, चिन्ह, झेब्रा क्रॉसिंग, नो पार्किंग, कर्कश्श हॉर्नने प्रदूषण होते याबाबत माहिती दिली. विविध चित्राद्वारे संदेश, जसे रस्ता कसा ओलांडायचा, सीट बेल्टचा वापर, हेल्मेटचा वापर, गाडी चालवताना मोबाईलवर संभाषण टाळणे व पिवळ्या व लाल सिग्नल बाबत माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली. 

लहानपणी वाहतुकीचे नियम विद्यार्थी वर्गाला दिले तर स्वतःची सुरक्षा ते करतील. त्यासोबत पालक असो, वाहनातून प्रवास करताना कोणीही असो, नियम मोडत असतील तर त्यांना सावध करतील यामुळे हळू-हळू का होईना अपघात कमी होतील आणि नागरीक सुरक्षित आणि सुखकर प्रवास करू लागतील यासाठी हे उपक्रम राबविले जात असल्याची माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी यावेळी दिली .

Web Title: Marathi news workshop for students on driving rules by kalyan RTO