Mumbai News: मराठी माणसा... जागा हो, मुंबई वाचव..! अज्ञाताकडून शहरात ठिकठिकाणी फलकबाजी; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics: 'मराठी माणसा तुला मराठीसाठी एकत्र यावंच लागेल’ अशा मजकुराचे फलक मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
Aggressive message banners in Mumbai

Aggressive message banners in Mumbai

ESakal

Updated on

मुंबई : महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच संपूर्ण मुंबईत अचानकपणे झळकलेल्या काही निनावी फलकांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘पायाखालची जमीन एकदा गेली की ती परत मिळत नसते’, ‘मराठी माणसा मुंबई वाचव!’, ‘ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे’ आणि ‘या वेळी तुला मराठीसाठी एकत्र यावंच लागेल!’ अशा आक्रमक मजकुराचे हे फलक शहरातील प्रमुख चौक, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा आणि वस्ती भागांत लावण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com