मराठी साहित्याचा आजपासून उत्सव! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली, - मराठी भाषेतील सर्वांत मोठा साहित्य उत्सव अशी ओळख असणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्या (ता. 2) पासून सुरवात होत आहे. सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे. 

पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली, - मराठी भाषेतील सर्वांत मोठा साहित्य उत्सव अशी ओळख असणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्या (ता. 2) पासून सुरवात होत आहे. सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे. 

संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे आणि मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व्यासपीठावर असतील. प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात हिंदी कवी विष्णू खरे उपस्थित राहणार आहेत. डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल पु. भा. भावे साहित्यनगरीच्या रूपाने सजले आहे. येथील शं. ना. नवरे सभामंडपात 3 ते 5 फेब्रुवारीपर्यंत मराठी साहित्यप्रेमींचा उत्सव साजरा होणार आहे. संमेलनाच्या 138 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच "आगरी यूथ फोरम' या सामाजिक संस्थेला संमेलनाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. डोंबिवलीला मिळालेल्या या सन्मानामुळे उत्साहित झालेले नागरिक साहित्यिक व साहित्यरसिकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. मान्यवर साहित्यिकांचा सहवास लाभलेली आणि राज्यातील महत्त्वाची सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीत संमेलनाचे आयोजन व्हावे, यासाठी अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न होत होते. आगरी यूथ फोरमच्या प्रयत्नांना यंदा यश मिळाले. 

शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडीने संमेलनाचा पहिला टप्पा सुरू होईल. गणेश मंदिर ते पु. भा. भावे साहित्यनगरीपर्यंत ग्रंथदिंडी चालणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन होईल. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते व महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन होणार आहे. त्यानंतर मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. या वेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्यास ठाण्यातील राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर कवी संमेलन आणि स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. 

इतिहासाला उजाळा! 
भव्यदिव्य आयोजनातून साहित्य संमेलनाचा देदीप्यमान इतिहास साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कला दिग्दर्शक संजय धबडे यांच्या कल्पनेतून पु. भा. भावे साहित्यनगरी सजली आहे. जात्यावर ओवी रचताना बहिणाबाई, सकाळी फेरफटका मारताना पु. ल. देशपांडे, लेखन करताना पु. भा. भावे आणि बाकावर बसलेली शं. ना. नवरे यांच्या साहित्यनगरीतील प्रतिकृती संमेलनातील आकर्षण ठरणार आहे. 

Web Title: marathi sahitya sammelan in dombivli