esakal | मराठी शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी द्या; संस्थाचालकांची मागणी | Marathi school
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi school

मराठी शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी द्या; संस्थाचालकांची मागणी

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : मागील काही वर्षामध्ये आर्थिक आणि सरकारकडून (Government) उशिरा मिळत असलेल्या वेतनेतर अनुदानामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या मुंबईतील मराठी शाळांनी (marathi school) शाळा सुरू करताना थकलेले अनुदान देऊन पायाभूत सुविधांसाठी (basic facilities) निधी देण्याची मागणी केली आहे. कोरोना काळात (corona pandemic) मराठी माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळा या आर्थिक संकटात सापडल्या असून दुसरीकडे खूप मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आणि देखभालीचाही खर्च वाढला आहे. यामुळे सरकारने मराठी शाळा जगवण्यासाठी आणि सध्या सापडलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्व मराठी शाळांना विशेष अनुदान जाहीर (special grant) करावे मराठी शाळा संस्थाचालक संघाने केली आहे.

हेही वाचा: देशभरातील अॅप्रेंटिसशिप मेळाव्यात; एक लाख उमेदवारांना रोजगार

तर दुसरीकडे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लोकल ट्रेनच्या प्रवासासाठी मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून त्यासाठी मार्ग काढण्याची मागणीही केली आहे. मराठी शाळा संस्थाचालक संघाची नुकतीच एक ऑनलाइन बैठक झाली या बैठकीत संघाने मराठी शाळांचे प्रश्न मांडले आणि अनेक मागण्या केल्या.

हेही वाचा: तरुणाईच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय युवा संघटनांंनी एकत्र यावे - वरुण सरदेसाई

प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक सेंटर सुरू करणे हे मराठी शाळा आणि संस्थांना शक्य नाही. शिवाय इतर खर्चही करणे अवघड आहे. सीएसआरचा निधी कुठून आणायचा असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी शासन स्तरावर अतिरिक्त बसव्यवस्था आणखी काही दिवस करता येईल का, याचा विचार करावा अशीही मागणी या बैठकीत सरकारकडे करण्यात आली आहे. या बैठकीत मराठी शाळा संस्थाचालक संघाचे मार्गदर्शक व पदाधिकारी सुरेंद्र दिघे, सुशील शेजुळे, आशीर्वाद बोंद्रे, दीपक भाते,आदी उपस्थित हेाते.

loading image
go to top