अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे रेल्वे अपघातात निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

मुंबई - 'कुंकू' या गाजलेल्या मालिकेत बालकलाकाराची भूमिका साकारणारा उदयोन्मुख अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे (सोमवार) अपघाती निधन झाले आहे. मुंबईत मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह सापडला.

'कुंकू' मालिकेत त्याने साकारलेल्या जानकीच्या भावाच्या भूमिकेमुळे प्रफुल्लचा चेहरा घराघरात पोहचला होता. या मालिकेशिवाय त्याने 'तू माझा सांगती', आवाज- ज्योतिबा फुले, 'नकुशी' मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. 

अलीकडे प्रदर्शित झालेल्या 'बारायण' सिनेमातही त्याने भूमिका केली होती. प्रफुल्लच्या आकस्मित जाण्याने त्याच्या मित्र-परिवारासह मनोरंजन विश्वालाही धक्का बसला आहे.

Web Title: marathi serial kunku fame actor prafull bhalerao died in railway accident