

BMC Election
ESakal
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय पक्ष आणि धर्म कोणताही असो, मराठी उमेदवारालाच प्राधान्य द्यावे. ज्या मतदारसंघात एकापेक्षा जास्त मराठी उमेदवार आहेत तिथे मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राची संस्कृती याला महत्त्व देणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करणारा मराठी माणसाचा ‘महानगरपालिकेसाठी मराठीनामा’ बुधवारी (ता. ३१) मराठी अभ्यास केंद्राने जाहीर केला.