
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा वरळीतील डोम सभागृहात होत आहे. या मेळाव्यात ठाकरे बंधू काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. हिंदी सक्तीविरोधात दोन्ही बंधूंनी एकत्र मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र त्याआधीच सरकारने हिंदीबाबतचे जीआर रद्द केल्यानंतर आता विजयी मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी जंगी तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू तब्बल १८ वर्षांनी एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.