रायगडमध्ये झेंडूची फुले महागली; दसऱ्यामुळे 120 ते 200 रुपये प्रतिकिलोने विक्री

अमित गवळे
Saturday, 24 October 2020

सुधागड तालुक्‍यातील प्रयोगशील शेतकरी तुषार केळकर यांनी सांगितले की, गुढीपाडव्याला झेंडूचे चांगले उत्पादन काढले होते; मात्र त्याचवेळी कोरोनाची साथ आली आणि लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी झेंडूला उठावच मिळाला नाही. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. 
 

मुंबई- दसऱ्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील बाजारात सर्वत्र झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल झाली आहेत; मात्र यंदा अवकाळी पाऊस यामुळे फुलांचे झालेले नुकसान तसेच कोरोनामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी झेंडू शेतीकडे फिरवलेली पाठ यामुळे झेंडूला मागणी वाढल्याने भाव वधारले आहेत.

चौदा दिवस रुग्णालय शौचालयात मृतदेह पडून...

सध्या 120 ते 200 रुपये प्रतिकिलोने झेंडू विकला जात आहे. झेंडूला मागील वर्षी 80 ते 100 रुपये प्रतिकिलो भाव होता. सुधागड तालुक्‍यातील प्रयोगशील शेतकरी तुषार केळकर यांनी सांगितले की, गुढीपाडव्याला झेंडूचे चांगले उत्पादन काढले होते; मात्र त्याचवेळी कोरोनाची साथ आली आणि लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी झेंडूला उठावच मिळाला नाही. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. 

अवकाळी पावसामुळे झेंडूच्या पिकाचे नुकसान झाले. त्यात जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी यंदा झेंडूची फारशी लागवड केली नाही. परिणामी झेंडूला मागणी असूनही उत्पादन कमी आणि दूरच्या बाजारातून आणावे लागत असल्याने यंदा भाव वाढला आहे. 
- राजू फोंडे, फूलविक्रेता, पाली 

मागील वर्षी या हंगामात तब्बल तीन ते चार टन झेंडू विकला होता; मात्र यंदा कोरोनाचे सावट आणि लॉकडाऊनमुळे नुकसानीची भीती होती. त्यामुळे झेंडूची शेती केलीच नाही; पण झेंडूचा आताचा भाव आणि मागणी बघता झेंडूची शेती फायदेशीर ठरली असती. 
- अभिजित देशमुख, वाघोशी, सुधागड 

                  (संपादन- बापू सावंत)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marigold flowers are expensive in Raigad; Dussehra sells for Rs 120 to Rs 200 per kg