चौदा दिवस रुग्णालय शौचालयात मृतदेह पडून, शिवडीतील टीबी रुग्णालयाचा गलथानपणा

सुमित बागुल
Saturday, 24 October 2020

मुंबईत रुग्णालयाचा गलथानपणा पुन्हा एकदा समोर 

मुंबई : मुंबईत रुग्णालयाचा गलथानपणा पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळतोय. ही घटना वाचाल तर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. गेल्या चौदा दिवसांपासून कोरोना रुग्णाचा मृतदेह गायब असल्याची तक्रार येत होती. अखेर हा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा सर्व प्रकार घडलाय मुंबईतील शिवडी येथील टीबी रुग्णालयात.

सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला : 

गेल्या चौदा दिवसांपासून मृतदेह एकाच ठिकाणी पडून असल्याने मृतदेह पूर्णपणे  कुजला होता. मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती की मृतदेह कुणाचा आहे ही ओळख पटवणे देखील कठीण झालेलं. याबाबत तपास करत असताना जेंव्हा हॉस्पिटल रेकॉर्ड्स तपासले गेलेत तेंव्हा २७ वर्षीय सूर्यभान यादव बेपत्ता असल्याची माहिती समोर आली.

महत्त्वाची बातमी : जर्दा आहे सांगून बॅगेतून पाठवलं हशीश, हनीमुनसाठी गेलेलं दाम्पत्य आता कतारमध्ये खातंय जेलची हवा

सदर प्रकारावर रुग्णालय म्हणतय... 

हे टीबी रुग्णालय असल्याने या रुग्णालयामधून रुग्ण पळून जाणे ही काही नवीन बाब नाही. रुग्ण बेपत्ता असल्याची रुग्णालयामार्फत तक्रार केली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान रुग्णाकडून त्याच्या घरच्यांबाबत नीट माहिती दिली नसल्याचंही रुग्णालयाने सांगितलं.

या रुग्णालयात एकूण ११ करोना रुग्ण होते. त्यापैकी सूर्यभान  यादव या रुग्णाला पहिल्या मजल्यावर पुरुषांसाठी असणाऱ्या वॉर्डमध्ये दाखल करून घेण्यात आलेलं होतं. ४ ऑक्टोबरला शौचालयासाठी गेल्यानंतर श्वसनाचा त्रास झाल्याने ते तिथेच कोसळले असावेत अशी शक्यता रुग्णालयाकडून व्यक्त केली जातेय. 

खरंतर शौचालयांचा वारंवार वापर होत असतो. अशात त्यांची स्वच्छता देखील नेहमीच करावी लागते. एखादा रुग्ण शौचालयात कोसळून त्याच्या तिथे मृत्यू होणं आणि त्याची १४ दिवस दखल न घेणं यावरून आश्चर्य व्यक्त केलं जातंय. दरम्यान महानगरपालिकेने या रुग्णालयालातील ४० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे

body of covid patient found in washroom after fourteen days bmc issued notice to 40 people


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: body of covid patient found in washroom after fourteen days bmc issued notice to 40 people