Raj Thackeray
बदलापूर : बदलापूर पश्चिमेकडील बाजारपेठेत एका परप्रांतीय फेरीवाल्याने मराठी भाषेविषयी गरळ ओकल्याने, मनसैनिकांनी या फेरीवाल्याला बेदम चोप दिला. पालिकेचे कर्मचारी बाजारपेठेतील अतिक्रमणावर कारवाई करत असताना, या कर्मचाऱ्यांना विरोध करताना या फेरीवाल्याने मराठी भाषेविषयी आणि मराठी माणसांविषयी शिवीगाळ करत अपशब्द वापरले. ही बाब मनसैनिकांना कळताच त्यांनी या फेरीवाल्याला मारहाण केली.