शेवटचा रविवार ..दिवाळी खरेदीचा उत्साह

शेवटचा रविवार ..दिवाळी खरेदीचा उत्साह

मुंबई : पावसाच्या रिमझिमने रस्ते भिजले होते.. मात्र दिवाळीपूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने मुंबईतल्या बाजारपेठा गजबजल्या होत्या. दादर, लालबाग परिसरात ग्राहकांनी खरेदीसाठी तुफान गर्दी केली होती. कंदिल, कपडे, पणत्यांच्या खरेदीसाठी सकाळीच लोक बाहेर पडले.

शनिवारपासून पावसाने हजेरी लावल्याने ग्राहकांच्या खरेदी करताना तारांबळ उडत होती. फराळाच्या सामानासाठी किराणा मालाची दुकानात आणि सुपर मार्केटमध्ये गृहिणांची गर्दी होती. पावसामुळे आकाश कंदिल विक्रेत्यांच्या कंदिलावर मात्र संक्रांत आली. ताडपत्रीचा आधार घेत कंदिल विक्रेते कंदिल विकत आहेत. कपड्यांच्या खरेदीसाठी दादरमध्ये प्रचंड गर्दी झाली होती.

दादर येथील दुकानांमध्ये ग्राहकांच्या रांगा रांगा लागत होत्या. दादरमधील आयडियल गल्ली, विसावा गल्ली, कबुतर खाना येथे प्रचंड गर्दी होती. या गर्दीतून वाट काढले लोकांना कठिणा होऊन बसले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com