सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या

मुरलीधर दळवी 
शुक्रवार, 25 मे 2018

मुरबाड (ठाणे) : सासरच्या छळाला कंटाळून किसळ गावच्या महिलेने फॉरेट नावाचे विषारी औषध घेऊन गुरुवारी (ता. 24) आत्महत्या केली. या महिलेने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असावी असा तिच्या माहेरच्या नातेवाईकांना संशय असल्याने शुक्रवारी दुपारी पोलिसांनी या महिलेचे प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात पाठविले आहे.

शोभा काकाजी पडवळ (वय 28) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिला प्रथमेश (वय 7) व आदित्य (वय 3) अशी दोन मुले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी महिलेचा नवरा काकाजी खंडू पडवळ याला ताब्यात घेतले असून त्याच्यासह महिलेची सासू सुरेखा खंडू पडवळ व नणंद वर्षा भेरे यांच्या विरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेचे वडील शंकर धोंडू घरत यांनी केलेल्या तक्रारी नुसार मयत शोभाचा पती नेहमी दारू पीत होता. सासरी तिला शिवीगाळ मारहाण होत होती. तसेच तिचा मानसिक छळ केला जात होता. गुरुवारी रात्री शोभाचे नणंदे बरोबर भांडण झाले. नंतर तिने फॉरेट औषध घेतले, त्यानंतर तिला मुरबाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले तेथेच तिचा मृत्यू झाला.

शोभा हिला सासरच्या लोकांनी ठार मारले असावे असा नातेवाईकांचा संशय असल्याने त्यांचे विनंती नुसार नृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात हलविण्यात आला.

Web Title: married woman suicide for domestic violence