देशातील सर्वात मोठी मोटार उत्पादक कंपनी 'मारुती'च्या नफ्यात ५१ टक्के वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maruti country largest Motor Manufacturer Company saw 51 per cent increase in profit mumbai

देशातील सर्वात मोठी मोटार उत्पादक कंपनी 'मारुती'च्या नफ्यात ५१ टक्के वाढ

मुंबई : देशातील सर्वात मोठी मोटार उत्पादक कंपनी मारुतीच्या या वर्षीच्या जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या नफ्यात (१,८७६ कोटी रु.) मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत (१,२४१ कोटी रु.) ५१ टक्के वाढ झाली. कंपनीने आज ही माहिती जाहीर केली.ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या तिमाहीत त्यांना १,०४२ कोटी रुपये नफा झाला होता. सेमिकंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे त्यांच्या देशांतर्गत विक्रीत आठ टक्के घट झाली आहे; पण कंपनीने या तिमाहीत केलेली ६८,४५४ गाड्यांची निर्यात ही आतापर्यंत कोणत्याही तिमाहीत केलेली सर्वात मोठी निर्यात आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.

सध्या पोलाद, ॲल्युमिनियम व अन्य महत्त्वाच्या धातूंच्या किमतीत असामान्य वाढ झाल्यामुळे तो तोटा काहीअंशी भरून काढायला आम्हाला वाहनांच्या किमतीही वाढवायला लागल्या, असे कंपनीने म्हटले आहे. सेमीकंडक्टर चीपचा सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्यामुळे एकंदर वाहनांचे उत्पादनही या वर्षी २ लाख ७० हजारांनी कमी झाले. कंपनीकडे साधारण तेवढ्याच गाड्यांच्या मागण्या प्रतीक्षा यादीवर आहेत.

महसूल - कोटी रु.

 • यंदाची तिमाही २६,७४९

 • मागील वर्षीची हीच तिमाही २४,०३५

 • या वर्षी ११ टक्के वाढ.

 • ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाही २३,२५३

 • यंदा १५ टक्के वाढ

करोत्तर नफा - कोटी रु.

 • मार्च २०२२ आर्थिक वर्ष - ४,३८९

 • मार्च २०२१ आर्थिक वर्ष - ३,८७९

 • या वर्षी १२ टक्के जास्त

एकूण महसूल - कोटी रु.

मार्च २०२२ आर्थिक वर्ष - ८८,३३०

मार्च २०२१ आर्थिक वर्ष - ७०,३७२

या तिमाहीची विक्री

 • एकूण - ४,८८,८३० गाड्या (मागील वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा ०.७ टक्के कमी)

 • देशांतर्गत - ४,२०,३७६ गाड्या (मागील वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा ८ टक्के कमी)

 • निर्यात - ६८,४५४ गाड्या

 • या वर्षभराची एकूण विक्री - १६,५२,६५३ गाड्या

 • मागीलवर्षीच्या तुलनेत १३.४ टक्के जास्त

 • या वर्षाची देशांतर्गत विक्री - १४,१४,२७७ गाड्या

 • मागील वर्षीच्या तुलनेत ३.९ टक्के जास्त

 • या वर्षातील निर्यात - २,३८,३७६ गाड्या.

 • मागील वर्षातील निर्यात - ९६,१३९ गाड्या.

Web Title: Maruti Country Largest Motor Manufacturer Company Saw 51 Per Cent Increase In Profit Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top