मसाज पार्लरच्या नावाखाली 'नसते उद्योग', पोलिसांनी असा केला पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

सरकारकडून लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप सलून, मसाज पार्लर, ब्युटी पार्लर आदींना परवानगी नाही.

नवी मुंबई : मसाजच्या नावाखाली ग्राहकांसोबत अश्लील चाळे करणाऱ्या वाशी रेल्वेस्थानकाजवळील एलोरा स्पा ऍन्ड सलून या मसाज सेंटरवर वाशी पोलिसांनी छापा मारला आहे. या कारवाईत दोन महिलांसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या मसाज सेंटरमध्ये बोगस ग्राहक पाठवून ही कारवाई केली.

मोठी बातमी : धनंजय मुंडे यांना झालेल्या कोरोनाबद्दल मोठी अपडेट, डॉक्टर म्हणालेत...

सरकारकडून लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप सलून, मसाज पार्लर, ब्युटी पार्लर आदींना परवानगी नाही. असे असताना वाशी रेल्वेस्थानकाजवळ हावरे इन्फोटेक पार्कमधील एलोरा स्पा ऍन्ड सलून हे मसाज सेंटर विनापरवानगी सुरू केल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. तसेच या मसाज सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली अधिक पैसे घेऊन त्यांच्यासोबत बिभत्स व अश्लील चाळे करण्यात येत होते. 

महत्वाची बातमी ठाकरे सरकारकडून चीनला धक्का, 'ते' तीन करार केले रद्द

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश महाला व त्यांच्या पथकाने या मसाज पार्लरवर बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर तेथे छापा मारून पोलिसांनी पार्लर चालवणाऱ्या महिलेसह मसाज करणारी महिला व मॅनेजर अशा तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत स्पामध्ये कामाला असलेल्या महिलेकडून एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली अतिरिक्त पैसे घेऊन ग्राहकांसोबत अश्लील व बीभत्स चाळे करण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तिघांवर लॉकडाऊनच्या आदेशाचे भंग केल्याप्रकरणी आणि अनैतिक धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 Massage parlor exposed by the police, read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Massage parlor exposed by the police, read full story