तारापूर MIDC मध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; ८ जण दगावल्याची शक्यता

तारापूर MIDC मध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; ८ जण दगावल्याची शक्यता

पालघर - तारापूर MIDC परिसरात भीषण स्फोट झालाय. पालघरच्या विकास केमिकल या कंपनीत भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळतेय. या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमनदल घटनास्थळी दाखल झाली आहे. सदर स्फोट तारापूर MIDC मध्ये झालाय. या फोटामुळे बाजूच्या तीन कंपन्यांना आग लागल्याची माहिती देखील समोर येताना दिसतेय. हा स्फोट एवढा भीषण होता की या स्फोटामुळे आसपासच्या दहा किलोमीटर परिघापर्यंत याचा आवाज गेला आणि हादरे बसलेत. या स्फोटाचा आवाज पंचवीस किलोमीटरपर्यंत ऐकू आलाय.  

घटनास्थळी अग्निशमनदल दाखल

घटनास्थळी सध्या अग्निशमनदल दाखल झालंय. प्राथमिक माहितीच्या आधारे हा स्फोट विकास केमिकल या कंपनीच्या बॉयलरमध्ये झाल्याचं समजतंय. स्फोटानंतर लागलेल्या आगीचे लोळ हे अनेक किलोमीटर दुरून देखील पाहायला मिळतायत. 

कंपनीच्या मालकासह आठ कामगारांचा मृत्यू

पालघर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील m2 या प्लॉटमधील कारखान्यात संध्याकाळी ६.५० च्या सुमारास सुमारास हा भीषण स्फोट झाला. या अपघातांमध्ये कंपनीच्या मालकासह आठ कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. पूर्वी तारा नाईट्रेट या नावाने ओळखलय जाणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला आहे. सध्या या कंपनीचं नाव विकास केमिकल्स असं आहे. 

स्फोटामुळे आवारतील इमारत कोसळल्याची माहिती

या स्फोटामुळे कंपनीच्या आवारतील एक इमारत कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. या कंपनीतील स्फोटानंतर अवशेष लगतच्या काही कारखान्यात उडाल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या कंपनीमध्ये अमोनिअम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवले जात असल्याचे सांगण्यात येत असून या स्फोटाचा आवाज २५ ते ३० किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. डहाणू व पालघर पर्यंतच्या गावांमध्ये ते ऐकू आला. अनेक नागरिकांना पालघर भागात भूकंप झाल्याचा भास सुरुवातीला झाला. मात्र काही वेळाने हा स्फोटाचा आवाज असल्याचे स्पष्ट झाले.

स्फोटानंतर संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा बंद

या स्फोटानंतर संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे अपघाताची तीव्रता नेमकी समजू शकली नाही. तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून जखमी व मृत कामगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

massive blast in tarapur MIDC chemical factory eight people are suspected to be dead

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com