Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
esakal
नितीन बिनेकर
मुंबई : वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरात पश्चिम रेल्वेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने तिसऱ्या दिवशी वेग पकडला असून आतापर्यंत ८५ टक्के कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. ५०० पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामांपैकी ४०० हून अधिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून उर्वरित कारवाई पुढील दोन दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. दगडफेक, आंदोलन आणि लाठीचार्जामुळे गाजलेल्या परिसरात गुरुवारी तणावपूर्ण शांतता होती; मात्र रेल्वे प्रशासनाने बुलडोझरची मोहीम वेगातच सुरू ठेवली.