
मुंबईत आगीच्या घटना वाढत आहेत. आज वाशीच्या एपीएमसी मार्केटजवळील परिसरात भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.