मुंबईतील GST भवन इमारतीला भीषण आग, उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी दाखल...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

मुंबई - मुंबईतील माझगाव भागातील GST भवन इमारतीला भीषण आग लागली आहे. १२ मजली असलेल्या या इमारतीच्या आठव्या मजल्यावरील काही मजल्यांवर आग लागल्याची माहिती मिळतेय. आठव्या मजल्यावरील मजले हे रिकामे होते अशी  देखील प्राथमिक माहिती समोर येतेय. या मजल्यांवर नूतनीकरणाचं काम सुरु होतं. मोठ्या प्रमाणात फर्निचरचे देखील काम सुरु होतं. सदर इमारतीच्या वरील मजल्यांवर ही आग कशामुळे भडकली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अर्थ खात्यानंतर्गत येणारं हे कार्यालय असल्याने ही इमारत अतिशय महत्त्वाची आहे. 

मोठी बातमी - तब्बल ५९ वर्षानंतर येणार 'हा' योग; यंदाची महाशिवरात्र असणार विशेष...

सुदैवाची बाब म्हणजे वरील मजल्यांवर कुणीही कर्मचारी किंवा अधिकारी नव्हतं. या ठिकाणी नूतनीकरणाचं काम सुरु असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची कागदपत्र नाहीयेत अशीही माहिती समोर येतेय. मात्र या इमारतीत महत्त्वाची कार्यालये आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

दरम्यान, या महत्त्वाच्या इमारतीला आग लागल्याचं समाजतातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी दाखल झालेत. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनेची पाहणी केलीये आणि सदर घटनेवर लक्ष ठेऊन आहेत.  

मोठी बातमी - मंत्र्यांच्या बैठकीआधी नवाब मलिक यांचं 'मोठं' वक्तव्य, म्हणालेत... 

सदर आग ही लेव्हल ४ ची असल्याचं अग्निशमनदलाकडून सांगण्यात आलंय. या ठिकाणी अग्निशमनदलाकडून १६ अग्निशमनदलाचे फायर इंजिन्स, ९ वॉटर टँकर आणि ६ हायड्रॉलिक शिड्यांच्या माध्यमातून आग विझविण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

massive fire in mumbai gst bhavan building dcm ajit pawar reached at the location

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: massive fire in mumbai gst bhavan building dcm ajit pawar reached at the location