मंत्र्यांच्या बैठकीआधी नवाब मलिक यांचं 'मोठं' वक्तव्य, म्हणालेत...

मंत्र्यांच्या बैठकीआधी नवाब मलिक यांचं 'मोठं' वक्तव्य, म्हणालेत...

मुंबई - "राज्यात 'भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याची आणि पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्नं बघू नये. कारण महाराष्ट्रात आता पुन्हा विधानसभेच्या निवडणूका झाल्या तर भाजपची अवस्था दिल्लीच्या निवडणुकीपेक्षाही वाईट होईल", असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलंय.

आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचे नेते आणि मंत्र्यांची बैठक पार पडतेय आहे. या बैठकीआधी नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपला टोला लगावलाय. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनात बोलताना महाविकासआघाडीचं सरकार टिकणार नाही असं विधान केलं होतं.

काय म्हणाले होते फडणवीस :
 
"राज्यातलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं  सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते स्वत:च पडणार आहे. हिंमत असेल तर त्यांनी आज निवडणुका घेऊन दाखवाव्यात जनता कुणाच्या बाजूनं आहे ते कळेलच", असं आव्हान फडणवीस यांनी रविवारी भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनात बोलताना महाविकासआघाडीला दिलं होतं. यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिलीये.

काय म्हणाले नवाब मलिक :

"भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याची आणि पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्नं बघू नयेत. कारण महाराष्ट्रात आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपची अवस्था दिल्लीच्या निवडणुकीपेक्षाही वाईट होईल, भाजपच्या नेत्यांना सत्तेत बसण्याचा आजार झालाय, सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना सतत सत्तेची स्वप्नं पडतात. रात्री ते सत्तेची स्वप्नं बघतात आणि दुसऱ्या दिवशी सरकार पडण्याची वक्तव्यं करतात, त्यामुळे हा गंभीर आजार आहे... हा आजार आरोग्यासाठी बरा नाही. भाजपच्या नेत्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा",असाही टोला नवाब मलिक यांनी लगावलाय.

महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत ही बैठक केवळ मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आहे, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय.

nawab maliks big statement before NCP ministers met in mumbai     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com