esakal | अंगणवाडीत गावठी दारू निर्मितीचे साहित्य
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

अंगणवाडीत गावठी दारू निर्मितीचे साहित्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहा : गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य रोहा तालुक्यातील एका अंगणवाडीच्या स्वयंपाकगृहात लपवून ठेवल्याचे आढळून आल्यानंतर सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे. कोरोना काळात अंगणवाडी शाळा बंद असल्याने दारू तयार करणाऱ्या व्यक्तींनी या इमारतीत बेकायदेशीर साहित्य ठेवून इमारतीचा दुरपयोग केल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा: प्रियांका गांधींची अटक बेकायदेशीर आणि लाजीरवाणी - चिदंबरम

रोहा पोलिसांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला असून दोघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेतील दोन्ही आरोपी अद्याप फरारी आहेत. दीपक परशुराम म्हात्रे आणि आल्हाद गणेश महाडिक (दोघे रा. सुडकोली) अशी आरोपी व्यक्तींची नावे असून त्यांनी रोहा यशवंतखार मार्गावरील दापोली गावातील अंगणवाडी शाळेच्या स्वयंपाकगृहात बेकायदा गावठी दारू निर्मितीचे साहित्य ठेवले आहे, अशी माहिती रोहा पोलिसांना समजताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात २६ हजार ४०० रुपये किमतीचे गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे घातक

loading image
go to top