आयआयटीमध्ये गणिताचा अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

मुंबई - पवईतील आयआयटी या शैक्षणिक संस्थेत गणित विभागाकडून नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. जुलैमध्ये ‘बॅचलर ऑफ सायन्स इन मॅथेमॅटिक्‍स’ हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. हा चार वर्षांचा अभ्यासक्रम असून, वेगवेगळ्या विषयांचा या ॲडव्हान्स कोर्समध्ये समावेश केल्याचे आयआयटीकडून सांगण्यात आले. यासह मूलभूत विज्ञानाच्या अभ्यासासह, अभियांत्रिकी, मानवी नियमन आदी गोष्टींचा समावेशही अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी जेईई ॲडव्हान्समधून परीक्षा दिल्यानंतर प्रवेश दिला जाईल. यातून गणित विषयातील कुशलता विद्यार्थ्यांमध्ये तयार होईल, असा विश्‍वास आयआयटीने व्यक्त केला.

Web Title: Mathematical syllabus in IIT