माथेरानमध्ये पावसामुळे झाडे कोसळली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मुंबई : माथेरानमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. अतिवृष्टीमुळे जमिनीची धूप होऊन अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष मुळासकट उखडले गेले आहेत.माथेरानमध्ये मंगळवारी पहाटे ८ ते १० ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.

मेरिटाईम हाऊस रोड, माधवजी गार्डन, नगरपालिका दवाखाना, महात्मा गांधी रस्त्यावरील शैलेश स्टोअर्स व सलीम शेख यांच्या दुकानावर झाडे पडली. भास्कर घाग यांचे दुकान जांभळीची दोन झाडे पडल्याने जमीनदोस्त झाले. शेख यांच्या दुकानावर जांभळीचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले.

वाल्मीकीनगर येथेही झाड उन्मळून पडले; या घटनेत अशोक वाघेला यांचे घर थोडक्‍यात बचावले असले, तर जिजा देसाई यांच्या घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. सरकारने या बाधितांना तातडीने मदत पुरवावी, अशी मागणी केली जात आहे.

ही माहिती मिळताच नगरपालिकेचे बांधकाम सभापती प्रसाद सावंत, वरिष्ठ लिपिक रत्नदीप प्रधान, विकास पार्टे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. माथेरानमधील गंभीर समस्या असलेली जमिनीची धूप थांबवण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी, असे प्रस्ताव दिला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Matheran, 10 trees fell