माथेरानमध्ये गुरांची गुरगुर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटक संध्याकाळी बाजारपेठेत भटकंती आणि खरेदीसाठी येतात. त्या वेळी मोकाट गुरांच्या त्रास होतो. पर्यटकांच्या हातामध्ये वस्तू दिसताच ती मागे लागतात. 

माथेरान : माकडांमुळे माथेरानमध्ये येणारे पर्यटक त्रस्त असतानाच आता त्यात मोकाट गुरांची भर पडली आहे. पर्यटकांकडून काहीतरी मिळेल, म्हणून ती चक्क त्यांच्या मागे लागतात. 
आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटक संध्याकाळी बाजारपेठेत भटकंती आणि खरेदीसाठी येतात. त्या वेळी मोकाट गुरांच्या त्रास होतो. पर्यटकांच्या हातामध्ये वस्तू दिसताच ती मागे लागतात. 

हे वाचा : मंत्री थोरातांच्या कन्येचा डान्स व्हायरल

गोशाळा नावापूरतीच 
माथेरानमध्ये मोकाट गुरांचा उपद्रव टाळण्यासाठी पालिकेने गोशाळा बांधली आहे. तिच्या देखरेखीसाठी संस्था आहे; मात्र त्याकडे लक्ष देण्यात येत नाही. त्यामुळे गुरे मुख्य बाजारपेठेत मोकाट फिरत आहेत. 

नगरपालिकेचे दुर्लक्ष 
मोकाट गुरांचा त्रास होऊ नये, यासाठी पालिकेकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. पूर्वी या गुरांना बाजारपेठेतून बाहेर नेण्यासाठी पालिकेने कर्मचारी तैनात केले होते. 

माथेरानमध्ये वातावरणाने आल्हाददायक आहे; मात्र गुरांचा त्रास आहे. ती मागे येत होती. त्यामुळे खरेदी करता आली नाही.
- व्यंकटेश रेड्डी, पर्यटक, बंगळूरु 

माथेरान बाजारपेठेत गुरांच्या उपद्रवामुळे पर्यटकांना खरेदी करता येत नाही. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. याबाबत गोशाळा अध्यक्षांच्या निदर्शनास ही बाब आणली आहे. त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही. 
- राजेश चौधरी, अध्यक्ष, व्यापारी फेडरेशन 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Matheran Bazaar, the tourists suffer due to the cattle.