माथेरानमधील बांधकामांना कायद्यानुसारच संमतीपत्र - रामदास कदम

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 मार्च 2017

मुंबई - कायद्यातील तरतुदींची पूर्तता होत असेल तरच माथेरानमधील पूर्वीच्या बांधकामांच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे दिल्या जाणाऱ्या संमतीपत्राचे नूतनीकरण करावे, असे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी संबंधितांना दिले. 

माथेरान पालिकेच्या समस्यांविषयी मंत्रालयात बैठक झाली. आमदार मनोहर भोईर, माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंबे, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, गटनेता प्रसाद सावंत, पर्यावरण विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. एन. अन्बलगन, शिवसेना उपनेते आदेश बांदेकर यावेळी उपस्थित होते. 

माथेरान पालिकेचा परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर करण्यात आला आहे. त्यापूर्वीच्या बांधकामांसाठी दिलेल्या संमतीपत्रांचे नूतनीकरण हरित लवादाच्या नियमांप्रमाणे व्हावे, असे कदम यांनी स्पष्ट केले. याबाबत केंद्र सरकारमार्फत समिती स्थापन करण्यात येते. त्याविषयीची अधिसूचना लवकरच काढण्यात येईल. नंतर झालेल्या "एचटीपी' लागू नसलेल्या बांधकामांना पाणी व वीज पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

Web Title: matheran construction issue