Mini Train : मिनी ट्रेनमुळे रेल्‍वेच्या तिजोरीत २९ लाखांची भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Matheran mini train addition of 29 lakhs treasury 21 thousand tickets sold in five months mumbai

Mini Train : मिनी ट्रेनमुळे रेल्‍वेच्या तिजोरीत २९ लाखांची भर

मुंबई : पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या माथेरानच्या मिनी ट्रेनला तुफान प्रतिसाद मिळत आहे. पाच महिन्यांत माथेरानच्या राणीची २१ हजारांची तिकीटविक्री झाली असून यातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत तब्बल २९ लाखांच्या महसुलाची भर पडली आहे.

थेरान म्हणजे मुंबईतील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ. नेरळ-माथेरान मिनी ट्रेन २२ ऑक्टोबर २०२२ रोजी पुन्हा सुरू झाली तेव्हापासून निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात हिल स्टेशनवर दाखल होत आहेत.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत मिनी ट्रेनच्या १ हजार ३४० व्हिस्टाडोम, १ हजार ८४९ प्रथम श्रेणी आणि १८ हजार ५१ द्वितीय श्रेणीसह एकूण २१ हजार २४० तिकिटांची विक्री झाली आहे.

त्यातून २९ लाखांचा महसूल मध्य रेल्वेने मिळविला आहे. त्यामध्ये व्हिस्टा डोम तिकिटांच्या विक्रीतील ९ लाख २९ हजार ३४० रुपयांच्या उत्पन्नाचा समावेश आहे.अलीकडेच, मध्य रेल्वेने प्रवाशांच्या फायद्यासाठी माथेरान टॉय ट्रेनला विशेष एसी सलून कोच जोडण्याची घोषणा केली.

टॉय ट्रेनला जोडलेला एसी सलून कोच आठ आसनी असेल. नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवशी आणि रात्रीच्या मुक्कामाच्या बुकिंगसाठी तो उपलब्ध असेल. आगामी सुट्टीचा हंगाम पर्यटकांसाठी उत्तम असेल. सलून कोचसाठी

इच्छुक असलेल्यांनी बुकिंगकरिता नेरळच्या मुख्य बुकिंग पर्यवेक्षकांशी संपर्क साधण्याचे आहवान मध्य रेल्वेने केले आहे.