

Neral to Matheran toy train
Sakal
मुंबई : पर्यटकांचे खास आकर्षण असलेली ‘माथेरानची राणी’ म्हणजेच ऐतिहासिक मिनी ट्रेन गुरुवारपासून (ता. ६) पुन्हा प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे. पावसाळ्यानंतर रेल्वे प्रशासनाने मार्ग दुरुस्ती, भूस्खलनग्रस्त भागांची साफसफाई आणि सुरक्षा तपासणी पूर्ण केली असून आता या गाडीच्या पुर्नप्रारंभाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.