esakal | पाणी शुल्कवाढीमुळे माथेरानकर मेटाकुटीला
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पाणी शुल्कवाढीमुळे माथेरानकर मेटाकुटीला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माथेरान : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचे महागाई आणि कोरोनामुळे कंबरडे मोडले असतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी शुल्कात वाढ करून येथील पर्यटन व्यवसायाचे मोठे नुकसान केले आहे. यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांत संताप आहे. कोरोनामुळे बंद असलेला माथेरान येथील पर्यटन व्यवसाय तीन महिन्यांपासून सुरू झाला आहे, परंतु जीवन प्राधिकरणाने पाणी शुल्कवाढ करून येथील स्थानिक आणि व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळवले.याबाबत स्थानिक रहिवासी प्रकाश सुतार यांनी सांगितले, की पाणी हेच जीवन असे म्हटले जाते, पण माथेरानमध्ये याविरुद्ध सर्व होत आहे. दीड वर्ष कोरोनामध्ये वाया गेली. अनेकांचा रोजगार गेला. आता पाणी शुल्कवाढ करून जगणेच कठीण केले.

हेही वाचा: Sakinaka Case: नक्की काय घडलं याबाबत अनभिज्ञ आहोत- मुंबई पोलिस आयुक्त

याबाबत जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व्ही. के. सूर्यवंशी यांनी सांगितले, की पाणी शुल्कवाढ दर तीन वर्षांनी केली जाते. आमचा अर्थ विभाग यावर काम करत असतो. तीन वर्षांतील नफा-तोटा याचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर माथेरानमध्ये ही वाढ केली जाते. माथेरान अभय योजना लागू झाली तर देयकात कपात होण्यासाठी विचार होऊ शकतो. त्यानंतरच नागरिकांना दिलासा मिळेल.

loading image
go to top