चाकू, अडकित्याचा धाक दाखवत खंडणी उकळण्याचा प्रकार

सहाजणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद
crime news
crime newssakal

इचलकरंजी : आर्थिक व्यवहारातून खासगी प्रकल्प सल्लागाराला दोरीने बांधून चाकू व अडकित्ता यांचा धाक धाकवत तब्बल ३५ लाख ३० हजाराची खंडणी उकळण्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी नगरसेविकेचा पती मदन सिताराम जाधव (रा.दातार मळा) याच्यासह सहाजणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची तक्रार मुस्ताकअहमद मन्सुर मुजावर (वय ४४, रा.सांगली रोड) यांनी दिली आहे.

crime news
२०२१-२२ चा डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार जाहीर

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार मुजावर हे खासगी प्रकल्प सल्लागार आहेत. शासनाच्या विविध योजनांतून उभारण्यात येणा-या संस्थांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम ते करतात. यातून दोन संस्थांचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. यातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत मुजावर आणि जाधव यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादातून जाधव यांने काल शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता फोन करुन मुजावर यांना सीए आल्याचे सांगून आपल्या घरातील कार्यालयात बोलावून घेतले.

crime news
'वरद बाळा, ये रे परत.!'; वरदच्या फोटोपूजनवेळी आई-वडिलांची आर्त हाक

या ठिकाणी जाधवसह अमोल बळीराम अरसूर (रा.दातार मळा), प्रणव पाटील, अनिकेत, पाटील व अन्य एक अनोळखी व्यक्ती उपस्थीत होते. यावेळी जाधव यांने आपले मेव्हणे अभिजीत व अमोल यांचे मुजावर याच्यामुळे नुकसान झाल्याचा गैरसमज निर्माण करुन घेतला. यावेळी जाधव यांने मुजावर यांच्याकडे ५५ लाख रुपये देण्याची मागणी करीत हातांने मारहाण केली. तर अनिकेत व अनोळखी व्यक्तीने मुजावर यांचे हातपाय दोरीने बांधून ठेवत त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतला. अडकीत्यांने बोटे कापण्याची धमकी देव मोबाईलचा पासवर्ड घेतला. त्यानंतर मुजावर यांच्या गळ्यावर चाकू लावत मोबाईलव्दारे त्यांच्या भावाबरोबर रक्कम देण्याबाबत सतत संपर्क साधला.

crime news
कृषीपंप वीज बिल थकबाकीमुक्त योजनेत शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

या प्रकारानंतर मुजावर यांच्या दिलशाद गारमेंट या संस्थेची २५ लाखांची ठेव मोडून ती बँकेच्या चालू खात्यावर ट्रान्फसर केली. त्यानंतर एकूण ३३ लाख रुपये चंद्रकला बळीराम ग्रुपच्या एका सहकारी बँकेमधील खात्यावर ट्रान्सफर केली. त्याच प्रमाणे अमोल अरसूर यास दोन लाखाची रोकड तर गुगल पे वरुन ३० हजार रुपये असे एकूण ३५ लाख ३० हजार रुपये मुजावर यांच्याकडून जबरदस्तीने मारहाण करीत काढून घेतले. यावेळी त्यांना संशयितांनी जीवे मारण्याची धमकी देवून शिविगाळ केली. याबाबतची आज मुजावर यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी जाधव याच्यासह कांही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या प्रकरणी संशयित जाधव यांनी मुस्ताक यांच्यासह त्याची पत्नी व वडील मन्सूर यांच्याविरोधात शिविगाळ करून धक्काबुक्की केल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी या तिघांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com