esakal | काय आहे मातोश्री-2? जाणून घ्या, कोठे आहे ही इमारत?
sakal

बोलून बातमी शोधा

matoshree 2 building information in marathi

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात मातोश्री हे राज्यातीलच नव्हे तर, देशातील एक सत्ता केंद्र होते.

काय आहे मातोश्री-2? जाणून घ्या, कोठे आहे ही इमारत?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या मुख्यमंत्रिपदावर काल विधानसभेतही शिक्कामोर्तब झाले. आता मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी निवासस्थानात उद्धव ठाकरे जाणार का? अशी चर्चा सुरू असताना, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री-2 या इमारतीचीही चर्चा सुरू झाली आहे. वांद्रेमधील कलानगरमध्ये असणाऱ्या मातोश्री इमारतीजवळच ही मातोश्री-2 इमारत उभारण्यात आली असून, ती चर्चेत आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

का सुरू आहे मातोश्री-2ची चर्चा
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात मातोश्री हे राज्यातीलच नव्हे तर, देशातील एक सत्ता केंद्र होते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर, केंद्रातील अनेक राजकीय हालचाली मातोश्रीवरून घडल्या आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी मातोश्रीला भेट दिली आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालीय. त्यामुळं एक नवा अध्याय सुरू झाला असताना, नवे सत्ताकेंद्र समोर आले आहे. मातोश्री नव्हे तर, मातोश्री-2 या इमारतीची सध्या चर्चा सुरू झाली आहे. कलानगरमधील ही इमारत बांधून तयार असून, ठाकरे कुटुंब तेथे शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कारभार मातोश्रीवरून चालणार की, वर्षा बंगल्यावरून की मातोश्री-2वरून याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. 

आणखी वाचा - देवेंद्र फडणवीस यांना धक्का; विरोधीपक्ष नेतेपदाची निवड लांबणीवर

आणखी वाचा - भाजप नगरसेवक देणार राजीनामा?

कशी आहे मतोश्री-2 इमारत?

  • एकूण जागा - 10 हजार स्वेअर फूट
  • इमारतीत 3 ड्युप्लेक्स फ्लॅट
  • 5 बेडरूम, एका स्टडी रूमचा समावेश 
  • होम थिएटरसह स्विमिंग पूलची सुविधा
  • मोठी जीम आणि एक छोटे सभागृह
loading image