पूरग्रस्तांना अल्लाह ताकद दे!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सांगली, सातारा व कोल्हापूरसहीत पश्‍चिम महाराष्ट्रावर आलेल्या नैसर्गिक संकटाशी सामना करण्याची ताकद दे, अशी दुवा नवी मुंबईतील सर्वच मदरसे आणि मशिदीतून अल्लाहकडे करण्यात आली.

नवी मुंबई : सांगली, सातारा व कोल्हापूरसहीत पश्‍चिम महाराष्ट्रावर आलेल्या नैसर्गिक संकटाशी सामना करण्याची ताकद दे, अशी दुवा नवी मुंबईतील सर्वच मदरसे आणि मशिदीतून अल्लाहकडे करण्यात आली. घणसोली, खैरणे, नेरूळ व सानपाडा येथील मशिदीमध्ये बकरी ईद निमित्ताने सकाळी अदा करण्यात आलेल्या नमाजीत सर्व मुस्लिम बांधवांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना भरभरून मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. आवाहनाला प्रतिसाद देत नेरूळ, सिवूड्‌स आणि खैरणे गावातील मुस्लिम बांधवांनी साध्या पद्धतीने ईद साजरी केली. 

नवी मुंबईतील हिंदू-मुसलमान भाईचारा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला. सोमवारी बकरी ईद निमित्ताने ठिक-ठिकाणी अदा करण्यात आलेल्या नमाजीत पुरग्रस्तांसाठी दुवा मागण्यात आली. तसेच जास्तीत जास्त बांधवांनी पुरग्रस्तांना हवी ती मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले. खैरणे गावातील दारूल उलुम अश्रफिया कादरीया मदरशात आणि खैरणे गाव जामा मशिदीत नमाज अदा करताना पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. नेरूळ येथील दर्गा मशिदीतही नमाज अदा करताना पुरग्रस्तांना या संकटातून सावण्यासाठी अधिक बळ मिळो अशी दुवा मागण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: May Allah give strength to flood victims!