महापौर अपेक्षा पाटील यांची उमेदवारी अर्ज बाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

उल्हासनगर - उल्हासनगर महापालिका निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची बनत चालली असून, शिवसेनेच्या विद्यमान महापौर अपेक्षा पाटील यांचा उमेदवारी अर्जच नामनिर्देशन पत्रांच्या छाननी वेळी बाद झाला आहे. त्यामुळे उल्हासनगरात घराणेशाही कायम ठेवणाऱ्या शिवसेनेला मोठा हादरा बसल्याची चर्चा सुरू आहे.

महापौर अपेक्षा पाटील, विनोद ठाकूर, बशीर शेख, माया चावला असे 19 नंबरचे पॅनल शिवसेनेने जाहीर केले होते. या पॅनलला काल उमेदवारी अर्ज भरताना ग्रहणच लागले. बशीर शेख यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास उशीर झाल्याने त्यांना उमेदवारी अर्जच भरता आला नाही. हीच स्थिती माया चावला यांचीही झाल्याने त्यांनाही वेळेत ऑनलाईन अर्ज सादर करता आला नाही. त्यात मुळात 20 क्रमांकाच्या पॅनलमध्ये राहणाऱ्या महापौर अपेक्षा पाटील यांना बाजूच्याच 19 नंबरच्या पॅनलमध्ये उमेदवारी देण्यात आली; मात्र 19 पॅनलचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी या पॅनलऐवजी 20 नंबरच्या पॅनलचे सूचक व अनुमोदक उमेदवारी अर्जात नमूद केले. हीच बाब भोवल्याने अपेक्षा पाटील यांचा अर्ज छाननी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी बाद केला.

दरम्यान, 19 पॅनलमध्ये मीना सोंडे, विजय पाटील, मिनाक्षी पाटील, किशोर वनवारी हे भाजपचे उमेदवार आहेत. शिवसेनेने विनोद ठाकूर, अपेक्षा पाटील, बशीर शेख, माया चावला हे तोडीस तोड पॅनल उभे केले होते. शिवसेना-भाजप यांची या पॅनलमध्ये टशन होणार, असे चित्र असताना तिघे या पॅनलमधून बाहेर पडल्याने शिवसेनेने हातचे पॅनेल घालविले आहे. विनोद ठाकूर एकटेच उमेदवार उरले असून, शिवसेना काही अपक्षांशी जुळवून घेण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Mayor Apeksha Patil election application rejected