महापौरपद आरक्षणासाठी आज सोडत 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मुंबई - राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता. 3) मंत्रालयात काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती नगरविकास विभागाने एका प्रसिद्धिपत्रकामार्फत दिली आहे.

राज्यातील दहा महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महापौरपदाच्या आरक्षणाबाबत राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्सुकता ताणली गेल्याने नगरविकास विभागाकडे वारंवार विचारणा केली जात होती. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सोलापूर, नाशिक, अमरावती, अकोला, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड या महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. 

Web Title: Mayor draw today for reservations