esakal | महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या, किरीट सोमय्यांना म्हणाल्या...
sakal

बोलून बातमी शोधा

महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या, किरीट सोमय्यांना म्हणाल्या...

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या, किरीट सोमय्यांना म्हणाल्या...

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः गेल्या महिन्यात मनसे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केला. मुंबईतील कोविड सेंटरचे काम देण्यात मुंबईच्या महापौरांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाच्या कंपनीला काम दिले असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. वरळी आणि इतर जम्बो कोविड सेंटरमध्ये लेबर सप्लायचे काम किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया या कंपनीला देण्यात आले.  त्यांचा यामध्ये पूर्वीच्या कामाचा अनुभव तपासला गेला का? कारण या कंपनीच्या ऍडशिनल डिरेक्टर म्हणून महापौरांचे चिरंजीव साईप्रसाद पेडणेकर असल्याचं मनसेने समोर आणलं होतं. त्यानंतर आता भाजपनं देखील याच संदर्भात नवा खुलासा करत महापौरांवर गंभीर आरोप केलेत. त्यावर आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

किश कॉर्पोरेट सव्हिसेस या कंपनीची नोंदणी ज्या पत्त्यावर आहे त्याच पत्त्यावर इतर आठ कंपन्यांची नोंदणी असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. या सर्व कंपन्या बोगस असण्याची शक्यता असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. त्यावर महापौरांनी घणाघात केली आहे. 

किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर किशोरी पेडणेकर चांगल्याच संतापल्या असून त्यांनी फक्त भो भो न करता आरोप सिद्ध करावं, असा हल्लाबोल महापौरांनी केला आहे. 

अधिक वाचाः मुंबईत नवीन 1,142 कोरोना रुग्णांची भर, रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर

किरीट सोमय्या यांनी फक्त आरोप करु नयेत. तर त्यांनी ते सिद्ध करावे, असं माझं त्यांना आवाहन आहे. याप्रकरणी 100 टक्के चौकशी व्हावी. आरोप सिद्ध झाले तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईन. आरोप सिद्ध न झाल्यास किरीट सोमय्या यांनी राजकारणातून कायमचं निवृत्त व्हावं. मी आतापर्यंत कधीच बोगस काम केलं नाही. यापुढेही करणार नसल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. 

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही सोमय्यांच्या आरोपावर टीका केली. स्वतःच अस्तित्व दाखवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. त्यांनी आतापर्यंत राजकीय नेत्यांवर जेवढे आरोप केले त्याचे पुढे काय झाले? त्यातून हा माणूस किती पोकळ आहे ते समजते. किरीट सोमय्यांची टीका ही गैर आणि लांच्छनास्पद असल्याचं अरविंद सावंत म्हणालेत.

हेही वाचाः लॉकडाऊनमुळे महामुंबईच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना खीळ; मजूर नसल्याने पूर्ण क्षमतेने काम करण्यास अडचणी
 

किरीट सोमय्यांचे आरोप

किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नोंद गोमती जनता सोसायटी, जी के कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३ या पत्त्यावर आहे.या कंपनीत महापौर पुत्र संचालक असून याच कंपनीला वरळी येथील कोविड केंद्रासाठी मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट मिळाले आहे.

याच पत्यावर इतर आठ कंपन्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या सर्व बोगस कंपन्या असण्याची शक्यता असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. या प्रकरणी राज्य सरकारकडे तक्रार केली असून या संदर्भातील मालकी हक्क आर्थिक हितसंबंध, व्यवहारातील पारदर्शकता याबाबत खुलासे व्हायला हवे असेही सोमय्या यांनी सांगितलं.

मनसेनंही केला होता आरोप 

मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिल्याचा गंभीर आरोप मनसेनं महापौरांवर केला होता.  वरळी आणि इतर जम्बो कोविड सेंटरमध्ये लेबर सप्लायचे काम किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया या कंपनीला देण्यात आले.  त्यांचा यामध्ये पूर्वीच्या कामाचा अनुभव तपासला गेला का? कारण या कंपनीच्या ऍडशिनल डिरेक्टर म्हणून महापौरांचे चिरंजीव साईप्रसाद पेडणेकर असल्याचं मनसेने समोर आणलं होतं. इतरांना ही टेंडर का मिळाली नाही, कोविड इमर्जन्सी आणि इ टेडरिंगच्या नावाखाली हा घोटाळा बीएमसीकडून करण्यात आला असल्याचंही मनसेनं म्हटलं होतं. मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले होते.

mayor kishori pednekar react on bjp kirit somaiya allegation